सञ्जय उवाच अध्याय पहिला भाग : २ (अर्जुनविषादयोग)
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत् ।।२।।
अध्याय पहिला (अर्जुनविषादयोग) भाग : २
सञ्जयः उवाच-संजय म्हणाला; दृष्ट्ा पाहून; तु-पण; पाण्डव अनीकम् पांडवांचे सैन्य; व्यूढम् व्यूहरचना; दुर्योधनः राजा दुर्योधन; तदा त्यावेळी; आचार्यम्-शिक्षक, गुरू; उपसङ्गम्य-जवळ जाऊन; राजा-राजा; वचनम् शब्द; अब्रवीत् म्हणाला.
संजय म्हणालाः हे राजन् ! पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढीलप्रमाणे बोलण्यास आरंभ केला.
अध्याय पहिला (अर्जुनविषादयोग) भाग : २
तात्पर्य : धृतराष्ट्र हा जन्मतःच आंधळा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिकदृष्ट्याही अंधच होता. त्याला नक्की माहीत होते की, आपली मुले ही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांबरोबर आपल्या मुलांचा कधीच सलोखा होणार नाही अशी त्याची खात्री होती. तरीसुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती. धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल केलेली हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता. म्हणून विषण्ण, उद्विग्न झालेल्या राजाला त्याला प्रोत्साहित करावयाचे होते आणि म्हणूनच त्याने राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की, पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत.
अध्याय पहिला (अर्जुनविषादयोग) भाग : २
यासाठीच संजयाने राजाला माहिती पुरविली की, दुर्योधनाने पांडवांचे सैन्यबळ पाहिले आणि तात्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला. या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले, यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते. पण जेव्हा त्याने पांडवसैन्याची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने नाह्यात्कारी मुत्सद्देगिरीचे प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही.
पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् ।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥३॥
Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!
पश्य-पहा; एताम्-ही; पाण्डुपुत्राणाम् पांडूच्या पुत्रांची; आचार्य हे आचार्य; महतीम्– विशाल; चमूम्-सैन्यदल; व्यूढाम् व्यूहरचना; द्रुपद पुत्रेण द्रुपद पुत्राने; तव-तुमचा; शिष्येण शिष्य; धी-मता अत्यंत बुद्धिमान.
हे आचार्य ! तुमचा बुद्धिमान शिष्य, द्रुपदपुत्र, याने कौशल्याने रचिलेली ही विशाल पांडवसेना पहा.
अध्याय पहिला (अर्जुनविषादयोग) भाग : २
तात्पर्य : मुत्सद्दी दुर्योधनाला, आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य, यांच्या चुका दाखवून द्यावयाच्या होत्या. द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्यांचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला, ज्यामुळे त्याला द्रोणाचार्यांचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली. द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि तरीसुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपविण्यात आलेल्या द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाला स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकविण्यात मुळीच कसर केली नाही.
अध्याय पहिला (अर्जुनविषादयोग) भाग : २
आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये धृष्टद्युम्नाने पांडवांची बाजू घेतली होती. त्याने द्रोणाचार्यांकडून प्राप्त झालेल्या युद्धकलेनुसारच पांडवसेनेची व्यूहरचना केली होती. द्रोणाचार्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष रहावे, म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. यावरून त्याला हे देखील दाखवून द्यावयाचे होते की, पांडव हे द्रोणाचार्यांचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये. विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता. अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो असा इशाराही दुर्योधनाने याद्वारे दिला. TO BE CONTINUE….