अध्याय पहिला (अर्जुन विषाद योग) Bhagavad Gita

अध्याय पहिला भाग : 10 (अर्जुनविषादयोग)

"Join our WhatsApp group and subscribe to our YouTube channel for the latest updates!"

किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा । अध्याय पहिला भाग : 10 (अर्जुनविषादयोग)

येषामर्थे काङ्गितं नो राज्यं भोगाः सुखानि च ॥ ३२॥

ते इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च।

आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः ॥३३॥

मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा ।

एतान्त्र हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।।३४।।

अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ।

निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन ।। ३५।।

अध्याय पहिला भाग : 10 (अर्जुनविषादयोग)

किम्-काय; किम्-काय लाभः नः-आम्हाला; राज्येन-राज्यापासून; गोविन्द-हे कृष्णः किम्-काय; भोगैः-उपभोग घेऊन; जीवितेन-जगून; वा-तसेच; येषाम्-ज्यांच्या; अर्थे-साठी; काङ्गित्तम्– इच्छिलेले; नः-आमच्यामुळे; राज्यम्-राज्य; भोगाः-ऐहिक किंवा सांसारिक भोग; सुखानि– सर्व सुखे; -सुद्धा; ते-ते सारे; इमे-हे; अवस्थिताः-उभे असलेले, स्थित; युद्धे-या युद्धभूमीत; प्राणान्-प्राण; त्यक्त्वा-सोडून, त्यागून, धनानि-धनाची, ऐश्वर्याची; -सुद्धा आचार्याः– गुरुजन; पितरः-पितृगण; पुत्राः-पुत्र; तथा-तसेच; एव-खचितच् -सुद्धाः पितामहाः– पितामहः मातुलाः-मामा; श्वशुराः-सासरे; पौत्राःनातवंडे;

श्यालाः-मेहुणे; सम्बन्धिनः– नातलग; तथा-तसेच; एतान्-हे सर्व; -कधीच नाही; हन्तुम्-ठार मारण्याची; इच्छामि-मी इच्छा करतो; घ्नतः-मी मारला गेलो; अपि-तरी; मधुसूदन-हे मधुसूदन (मधू दैत्याचा वध करणारे); अपि-जरी; त्रैलोक्य-तीन्ही लोकांचे; राज्यस्य-राज्याच्या; हेतोः-च्या बदल्यात; किम् नु-केवळ काय बोलावयाचे; मही-कृते-पृथ्वीच्या; निहत्य– ठार करून; धार्तराष्ट्रान् धृतराष्ट्रपुत्रांना; नः– आम्हाला; का-काय; प्रीतिः– आनंद; स्यात्-होणार आहे; जनार्दन-है जनार्दन (सर्व जीवांचे पालनकर्ता). (KRISHNA)

हे गोविंद ! ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची, सुखाची व जीविताची देखील इच्छा करावी तेच जर आता या रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले आहेत तर मग आम्हाला त्या सर्वाचा काय लाभ आहे? हे मधुसूदन ! जेव्हा गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा व संपत्तीचा त्याग करण्यास तयार आहेत आणि माझ्यासमोर उभे आहेत, तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी? हे जनार्दन ! पृथ्वीच काय तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या बदल्यातही मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही. धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळविणार?

Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!

अध्याय पहिला भाग : 10 (अर्जुनविषादयोग)

तात्पर्य : अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना गोविंद म्हणून संबोधले आहे कारण, श्रीकृष्ण हे इंद्रियांच्या आणि गायींच्या आनंदप्राप्तीचे केंद्रस्थान आहेत. अर्जुन या महत्त्वपूर्ण शब्दाचा उपयोग करून दर्शवू इच्छितो की, त्याच्या इंद्रियांचे समाधान कशामध्ये आहे हे श्रीकृष्णांनी जाणले पाहिजे. आमची इंद्रियतृप्ती करणे हे गोविंदांचे कार्य नव्हे. (ARJUN)

जर आपण श्रीगोविंदांची इंद्रिये संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपोआप आपली इंद्रियेही संतुष्ट होतात. भौतिकदृष्ट्या, प्रत्येकाला आपली इंद्रियतृ‌भी करावयाची असते आणि आपण मागू ती वस्तू भगवंतांनी द्यावी अशी त्यांची इच्छा असते. जीवांच्या योग्यतेप्रमाणे भगवंत त्यांची इंद्रियतृप्ती करतील पण त्यांच्या अतिलोभाची पूर्तता मात्र भगवंत करणार नाहीत. याच्या उलट मागनि मनुष्य जेव्हा जातो, म्हणजे जेव्हा एखादा स्वतःच्या इंद्रियतृप्तीची अजिबात इच्छा न करता श्रीगोविंदांच्या इंद्रियांची तृप्ती करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा श्रीगोविंदांच्या कृपेने जीवाच्या सर्व इच्छांची पूर्तता होते.

आपल्या कुटुंबातील व्यक्तीविषयीचे अर्जुनाचे प्रगाढ प्रेम या ठिकाणी अंशतः दिसून येते. कारण, त्याला त्यांच्याबद्दल स्वाभाविक करुणा होती. आणि यासाठीच तो युद्ध करण्यास तयार नव्हता. प्रत्येकाला स्वतःचे ऐश्वर्य आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना दाखवायची इच्छा असते; परंतु अर्जुनाला भीती वाटते की, त्याचे सर्व नातलग अणि मित्र रणांगणावर मारले जातील आणि विजयानंतर प्राप्त होणाऱ्या वैभवामध्ये तो कोणालाच सहभागी करू शकणार नाही. भौतिक जीवनाबद्दलचे हे एक नमुनेदार उदाहरण आहे. आध्यात्मिक किंवा दिव्य जीवन हे अगदी भिन्न असते. (DRAUPADI)

अध्याय पहिला भाग : 10 (अर्जुनविषादयोग)

एखाद्या भक्ताला भगवंतांची इच्छापूर्ती करावयाची असल्याने तो भगवंतांच्या सेवेसाठी सर्व प्रकारचे ऐश्वर्य स्वीकारू शकतो आणि जर भगवंतांची इच्छा नसेल तर मात्र तो कवडीचाही स्वीकार करणार नाही. अर्जुनाला त्याच्या नातलगांना मारावयाचे नव्हते आणि खरोखरच जर त्यांना मारणे आवश्यक असेल तर श्रीकृष्णांनी स्वतः त्यांना मारावे अशी त्याची इच्छा होती. या क्षणी अर्जुनाला माहीत नव्हते की, रणांगणावर येण्यापूर्वीच श्रीकृष्णांनी त्यांना मारले होते आणि त्याला फक्त श्रीकृष्णांच्या हातातील साधन बनावयाचे होते. त्याला फक्त निमित्तमात्र व्हावयाचे होते. (KALKI)

या वस्तुस्थितीचा उलगडा पुढील अध्यायांमध्ये करण्यात आला आहे. भगवंतांचा स्वाभाविक भक्त असल्याने अर्जुनाला त्याच्या दुष्ट चुलत्यांचा आणि बांधवांचा सूड घेणे आवडले नाही, पण त्या सर्वांची हत्त्या करणे ही भगवंतांची योजना होती. भगवद्भक्त हा दुष्टांचा सूड घेऊ इच्छित नाही. पण दुष्टांनी केलेला भक्तांचा अपराध भगवंत कधीच सहन करीत नाहीत. स्वतःच्या अपराधांबद्दल भगवंत एखाद्या व्यक्तीला क्षमा करू शकतात; पण भक्तांना दुखविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भगवंत क्षमा करीत नाहीत. म्हणून दुष्टांना क्षमा करावयाची इच्छा अर्जुनाला असली तरीही त्यांचा वध करण्यासाठी भगवंत दृढनिश्चयी होते. (VED)

अध्याय पहिला भाग : 10 (अर्जुनविषादयोग)

पापमेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः ।

तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्सबान्धवान् ।

स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥ ३६।।

पापम्-पापः एव-खचित; आश्रयेत्-भागी होणार; अस्मान्-आम्हाला; हत्वा-वध करून; एतान्-या सर्वांना; आततायिनः आततायी, आक्रमक; तस्मात्-म्हणून; -नाही; अर्हा:– योग्य; वयम्-आम्ही; हन्तुम्-मारण्याला; धार्तराष्ट्रान्-धृतराष्ट्रपुत्र; स-वान्धवान्-मित्रांसहित; स्व-जनम्-नातलग; हि-खचित्; कथम्-कसे; हत्वा-हत्त्या करून; सुखिनः-सुखी, आनंदी; स्याम-आम्ही होऊ, माधव-हे माधव (लक्ष्मीपती कृष्ण).

या आततायी आक्रमकांना आम्ही जर ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे. म्हणून धृतराष्ट्रपुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही. यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे? हे माधव ! आपल्याच नातलगांची हत्त्या करून आम्ही कसे सुखी होऊ? (MAHABHARAT)

Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!

अध्याय पहिला भाग : 10 (अर्जुनविषादयोग)

तात्पर्य : वैदिक मताप्रमाणे सहा प्रकारचे आततायी असतात. (१) जो विष देतो, (२) जो घराला आग लावतो, (३) जो घातक किंवा तीक्ष्ण शस्त्रानिशी हल्ला करतो, (४) जो संपत्ती लुटतो, (५) जो दुसऱ्याची जमीन बळकावतो आणि (६) जो परपत्नीचे अपहरण करतो. अशा आततायींचा वध केल्याने कोणत्याही प्रकारचे पाप लागत नाही. अशा आततायींना मारणे हे सामान्य मनुष्याला शोभेल असेच आहे; पण अर्जुन हा सामान्य मनुष्य नव्हता. (SANATAN)

स्वभावतःच तो साधुवृत्तीचा होता आणि त्यांच्याशी तो साधुवृत्तीला अनुसरूनच वागू इच्छित होता. पण अशा प्रकारची साधुवृत्ती क्षत्रियांसाठी योग्य नसते. जरी राज्यकारभारातील व्यक्तीने साधुवत् असणे आवश्यक असले तरी त्याने भ्याड मात्र असू नये. उदाहरणार्थ, भगवान श्रीराम हे इतक्या साधुवृत्तीचे होते की, आजही लोक रामराज्यात राहण्यास अतिशय उत्सुक आहेत; पण असे असले, तरी प्रभू श्रीरामचंद्रांनी कधीच भ्याडपणा दाखविला नाही.

अध्याय पहिला भाग : 10 (अर्जुनविषादयोग)

श्रीरामांच्या पत्नीचे, सीतेचे अपहरण करणारा रावण आततायी होता, पण श्रीरामांनी त्याला असा काही धडा शिकविला की, त्याची तुलना जगाच्या इतिहासामध्ये कोणाशीही करता येणार नाही. अर्जुनाच्या बाबतीत मात्र, त्याच्याविरुद्ध जे आक्रमक आततायी होते ते विशिष्ट प्रकारचे होते आणि ते म्हणजे त्याचे स्वतःचे पितामह, गुरुजन, मित्रगण, पुत्र, नातू इत्यादी. यांच्यामुळेच अर्जुनाला वाटले की, सामान्य आततायीविरुद्ध ज्या कडक उपाययोजना केल्या पाहिजेत त्या यांच्याविरुद्ध आपण योजू नये. याशिवाय साधुव्यक्तीने क्षमा करावी असे सांगितले जाते. (SHANTI)

साधुव्यक्तींसाठी असे आदेश हे राजकीय आणीबाणीपेक्षाही महत्त्वपूर्ण असतात. अर्जुनाने विचार केला की, राजकीय कारणांसाठी स्वजनांची हत्त्या करण्यापेक्षा साधुवृत्ती आणि धर्माच्या आधारावर त्यांना क्षमा करणे हेच योग्य आहे. म्हणून केवळ तात्पुरत्या शारीरिक सुखासाठी अशा प्रकारे हत्त्या करणे हे चांगले नाही असे त्याला वाटले. सरतेशेवटी राज्य आणि त्यापासून प्राप्त होणारे सुख हे नित्य नाही म्हणून स्वजनांचीच हत्त्या करून त्याने स्वतःची शाश्वत मुक्ती आणि स्वतःचे जीवन धोक्यात का घालावे? या संबंधात अर्जुनाने श्रीकृष्णांना ‘माधव’ असे संबोधणेही महत्त्वपूर्ण आहे. (MAN)

श्रीकृष्ण हे लक्ष्मीचे किंवा भाग्यदेवतेचे पती असल्यामुळे अर्जुनाला त्यांना हे दर्शवायचे होते की, त्यांनी ज्यामुळे त्याच्यावर दुर्भाग्य कोसळेल अशी गोष्ट करण्यास त्याला प्रेरित करू नये. परंतु वास्तविकपणे श्रीकृष्ण हे भक्तांनाच काय तर इतरांनाही दुर्भाग्याकडे कधीच नेत नाहीत. TO BE CONTINUE….

VISIT OUR WEBSITE

"Share this post with your family and friends for more exciting knowledge."

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp