अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि । अध्याय पहिला भाग : 3 (अर्जुनविषादयोग)
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ।।४।।
अत्र-येथे; शूराः शूरवीर; महा- इषु आसाः महान धनुर्धर; भीम-अर्जुन-भीम आणि अर्जुन; समाः बरोबरीचे; युधि युद्धामध्ये; युयुधानः युयुधान; विराटः विराट; च-सुद्धाः द्रुपदः– द्रुपदः च-सुद्धा; महारथः– महान योद्धा.
येथे (या सैन्यामध्ये) भीम आणि अर्जुन यांच्याबरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धेसुद्धा आहेत.
अध्याय पहिला भाग : 3 (अर्जुनविषादयोग)
तात्पर्य : द्रोणाचार्यांच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर धृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता, तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते. दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो. कारण, त्यांच्यापैकी प्रत्येकजण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता. त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती म्हणून इतरांची तुलना त्याने त्यांच्याशी केली.
Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!
अध्याय पहिला भाग : 3 (अर्जुनविषादयोग)
धृष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान् ।
पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः ।।५।।
धृष्टकेतुः धृष्टकेतुः चेकितानः चेकितानः काशिराजः काशिराजः च सुद्धा वीर्य वान्– अत्यंत बलशाली; पुरुजित् पुरुजित; कुन्तिभोजः कुंतिभोजः च आणि शैव्यः शैब्य; च– आणि, नरपुङ्गवः– मानव समाजातील श्रेष्ठ वीर.
तेथे श्रेष्ठ, शूरवीर आणि बलशाली असे धृष्टकेतू, चेकितान, काशिराज, पुरुजित, कुंतिभोज आणि शैव्य यांच्यासारखे योद्धे आहेत.
युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् ।
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः ।॥६॥
युधामन्युः युधामन्यूः च आणि; विक्रान्तः पराक्रमी उत्तमौजाः उत्तमौजाः च आणि; वीर्य-वान् अत्यंत शक्तिशाली सौभद्रः सुभद्रेचा पुत्र; द्रौपदेयाः द्रौपदीपुत्रः च-आणि; सर्वे– सर्व; एव निश्चितपणे; महा-रथाः महारथी.
तेथे पराक्रमी युधामन्यु, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रापुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत.
अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्द्रवीमि ते ।।७।।
अस्माकम्- आपले; तु-परंतु; विशिष्टाः विशेष बलशाली; ये-जे; तान् त्यांना; निबोध-नीट जाणून घ्या; द्विज-उत्तम हे ब्राह्मणश्रेष्ठा, नायकाः नायक, सेनापतीः मम-माझ्या; सैन्यस्य– सैन्याचे; संज्ञा-अर्थम्-जाणून घेण्यासाठी; तान् त्यांना; ब्रवीमि मी सांगतो; ते– तुम्हाला.
हे ब्राह्मणश्रेष्ठ! तुमच्या माहितीकरिता, माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो.
Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!
अध्याय पहिला भाग : 3 (अर्जुनविषादयोग)
भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः ।
अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ।।८।।
भवान्-आपण स्वतः; भीष्मः पितामह भीष्मः च आणि; कर्णः कर्ण; च-आणिः कृपः– कृपाचार्य; च-तथा; समितिञ्जयः नेहमी युद्धविजयी; अश्वत्थामा-अश्वत्थामा; विकर्णः – विकर्ण; च-तथा, सौमदत्तिः सोमदत्ताचा पुत्र; तथा-सुद्धाः एव नक्कीचः च सुद्धा.
येथे आपण स्वतः, भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्तपुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत.
तात्पर्य : दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्यांचा उल्लेख केला आहे. कारण, हे सर्व योद्धे अपराजित आहेत. विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे, अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा पुत्र आहे आणि सौमदत्ती किंवा भूरिश्रवा हा बाहलीकांच्या राजाचा पुत्र आहे. कर्ण हा अर्जुनाचा भाऊ आहे कारण, पांडू राजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पोटी जन्मला होता. कृपाचार्यांच्या जुळ्या बहिणीचा द्रोणाचार्याशी विवाह झाला होता.
अध्याय पहिला भाग : 3 (अर्जुनविषादयोग)
अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः ।
नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥९॥
अन्ये इतर सर्व; च-सुद्धा; बहवः मोठ्या संख्येने शूराः शूरवीरः मत्-अर्थे माझ्यासाठी; त्यक्त-जीविताः प्राण धोक्यात घालण्यास सज्ज आहेत; नाना अनेक शस्त्र-शस्त्रे; प्रहरणाः– युक्त, सुसज्जित; सर्वे-ते सर्व; युद्धविशारदाः युद्धकलेत निपुण असलेले.
माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत.
तात्पर्य : जयद्रथ, कृतवर्मा आणि शल्य यांसारख्या इतर योद्धघांविषयी सांगावयाचे झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तयार आहेत. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ आहे. वर सांगितलेल्या आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाबद्दल पूर्ण खात्री होती. TO BE CONTINUE….