अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् । अध्याय पहिला भाग : 4 (अर्जुनविषादयोग)
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ।।१०।।
अध्याय पहिला भाग : 4 (अर्जुनविषादयोग)
अपर्याप्तम्-अपरिमित; तत्-ते; अस्माकम् आमचे; बलम् शक्ती, बल; भीष्म पितामह भीष्मांद्वारे; अभिरक्षितम्-पूर्णपणे सुरक्षित; पर्याप्तम्-सीमित, परिमित; तु-परंतुः इदम् हे सर्व; एतेषाम्-पांडवांचे; बलम् शक्ती, बल; भीम भीमाने; अभिरक्षितम्-काळजीपूर्वक रक्षण केलेले.
आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत; परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे.
अध्याय पहिला भाग : 4 (अर्जुनविषादयोग)
तात्पर्य : या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचा अंदाज व्यक्त केला आहे. सर्वांत अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती ही अपरिमित आहे असे त्याला वाटते. उलटपक्षी, कमी अनुभवी असलेल्या सेनापतीने म्हणजेच भीमाने रक्षिलेले पांडवसैन्य हे सीमित आहे. भीम हा भीष्मांच्या उपस्थितीत नगण्यच होता. दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सर करीत असे. कारण तो पूर्णपणे जाणून होता की, जर त्याचा मृत्यू होणारच असेल तर तो भीमाकडून होईल. पण त्याचबरोबर अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाची खात्री होती. या युद्धात आपला विजय होईल या आपल्या निष्कर्षाचा त्याला विश्वास पटला होता.
Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः ।
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥११॥
अध्याय पहिला भाग : 4 (अर्जुनविषादयोग)
अयनेषु व्यूहरचनेतील मोक्याच्या ठिकाणी; च-सुद्धा; सर्वेषु सर्व ठिकाणी; यथा-भागम्– निरनिराळ्या नेमलेल्या जागी; अवस्थिताः- स्थित असलेले; भीष्मम्-पितामह भीष्मांना; एव– निश्चित; अभिरक्षन्तु सर्व प्रकारे सहाय्य करा; भवन्तः तुम्ही; सर्वे सर्वांनी; एव हि-निश्चितच.
आता तुम्ही सर्वांनी सैन्यव्यूहरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण साह्य केले पाहिजे.
अध्याय पहिला भाग : 4 (अर्जुनविषादयोग)
तात्पर्य : भीष्मांच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की, इतर योद्धघांना आपण कमी महत्त्व दिले आहे असे वाटू नये, म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या मुत्सद्देगिरीला अनुसरून वरील शब्दांनी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने ठामपणे सांगितले की, भीष्मदेव हे निःसंशय सर्वश्रेष्ठ योद्धे आहेत. पण ते वृद्ध असल्याकारणाने त्यांचे सर्व बाजूंनी रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले असतील आणि इतर बाजूने शत्रू या संधीचा फायदा उठवू शकेल.
म्हणून इतर योद्धघांनी आपली मोक्याची ठिकाणे न सोडता शत्रूला व्यूहरचना भेदू न देणे हे महत्त्वाचे होते. कुरूंचा विजय हा भीष्मदेवांच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे, हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले. युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला खात्री होती. कारण ज्यावेळी मोठमोठ्या सेनापतींच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते, त्यावेळी तिने या दोघांकडे न्याययाचना केली होती. पण ते एक चकार शब्दही काढू शकले नव्हते हे दुर्योधन निश्चित जाणून होता. या दोघांच्या मनात पांडवांबद्दल जिव्हाळा असला तरी द्यूतक्रीडेप्रमाणेच आताही ते या जिव्हाळ्याचा त्याग करतील, अशी त्याला आशा होती.
Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!
तस्य सञ्जनयन्हर्ष कुरुवृद्धः पितामहः ।
सिंहनादं विनद्योच्चैः शङ्ख दध्मौ प्रतापवान् ।।१२।।
अध्याय पहिला भाग : 4 (अर्जुनविषादयोग)
तस्य-त्याचा; सञ्जनयन्-वाढवीत; हर्षम् हर्ष, आनंद; कुरु-वृद्धः कुरुवंशातील वयोवृद्ध (भीष्म); पितामहः– पितामह; सिंह-नादम्-सिंहगर्जनेप्रमाणे; विनद्य– निनाद करीत; उच्चैः-उच्च स्वरात; शङ्खम्-शंख; दध्मौ वाजविला; प्रताप-वान् पराक्रमी.
नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध, महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्याने, सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला.
अध्याय पहिला भाग : 4 (अर्जुनविषादयोग)
तात्पर्य : कुरुवंशातील पितामह आपला पौत्र दुर्योधन याच्या अंतःकरणातील भाव समजू शकले आणि त्याच्याबद्दल असलेल्या स्वाभाविक प्रेमामुळे त्यांनी दुर्योधनाला उत्साहित करण्यासाठी मोठ्याने शंख वाजविला. हा आवाज त्यांच्या सिंहासारख्या असणाऱ्या स्थितीला अनुरूपच होता. शंखध्वनीच्या संकेताने त्यांनी आपला पौत्र दुर्योधन याला सूचित केले की, त्याला युद्धात विजयी होण्याची शक्यताच नाही. कारण, विरुद्ध बाजूला स्वतः परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत. तरीसुद्धा युद्ध करणे हे त्यांचे कर्तव्य होते आणि यामध्ये ते कोणतीही कसर सोडणार नव्हते. TO BE CONTINUE….