अध्याय पहिला (अर्जुन विषाद योग) Bhagavad Gita

अध्याय पहिला भाग : 5 (अर्जुनविषादयोग)

"Join our WhatsApp group and subscribe to our YouTube channel for the latest updates!"

ततः शङ्खाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः । अध्याय पहिला भाग : 5 (अर्जुनविषादयोग)

सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ।।१३।।

ततः त्यानंतर; शङ्खाः– शंख; च-सुद्धा; भेर्यः मोठे नगारे, भेरी; -आणि; पणव-आनक– लहान ढोल आणि तुताऱ्या; गोमुखाः रणशिंग; सहसा अचानकपणे; एव-खचितच; अभ्यहन्यन्त-एकाचवेळी वाजू लागली; सः-तो; शब्दः (एकत्रित झालेला) आवाज; तुमुलाः– भयंकर; अभवत्-झाला.

त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुताऱ्या आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता.

अध्याय पहिला भाग : 5 (अर्जुनविषादयोग)

ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।

माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः ।।१४।।

ततः– त्यानंतर; श्वेतैः श्वेत किंवा शुभः हयैः घोड्यांनी; युक्तेः युक्त अशा; महति एका महान; स्यन्दने रथात; स्थित्तौ स्थित; माधवः श्रीकृष्ण (लक्ष्मीपती); पांडवः पांडुपुत्र अर्जुन; – सुद्धा; एव-निश्चितच; दिव्यौ दिव्य; शंङ्खी शंख; प्रदध्मतुः– वाजविले.

दुसऱ्या बाजूला, शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजविले.

Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!

अध्याय पहिला भाग : 5 (अर्जुनविषादयोग)

तात्पर्य : भीष्मदेवांनी वाजविलेल्या शंखाशी तुलना करताना, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजविलेल्या शंखांचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे. दिव्य शंखांच्या नादाने असे सूचित करण्यात आले आहे की, पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने विरुद्ध पक्षाला विजयाची आशा नव्हती. जयस्तु पाण्डुपुत्राणां येषां पक्षे जनार्दनः पांडुपुत्रांसारख्या व्यक्तींचाच नेहमी विजय होत असतो. कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचे सहकारी असतात. आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात, त्या ठिकाणी लक्ष्मीदेवीसुद्धा असते. (KRISHNA)

कारण लक्ष्मीदेवी आपल्या पतीशिवाय कधीही एकटी राहात नाही. म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखामधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंखध्वनीद्वारे कळून आले की, भाग्य आणि विजय अर्जुनाची वाटच बघत होते. या व्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथावर बसले होते, तो रथ अग्निदेवाने अर्जुनाला दान केला होता. यावरून आपल्याला असे लक्षात येते की, हा रथ त्रिलोकी कुठेही फिरविला तरी तो निश्चितपणे सर्वत्र विजयप्राप्ती करू शकतो. (ARJUN)

अध्याय पहिला भाग : 5 (अर्जुनविषादयोग)

पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः ।

पौण्ड्रं दध्मौ महाशङ्ख भीमकर्मा वृकोदरः ॥१५।।

पाञ्चजन्यम्-पाञ्चजन्य नावाचा शंख; हृषीक ईशः हृषीकेश (श्रीकृष्ण, जे भक्तांच्या इंद्रियांना मार्गदर्शन करतात); देवदत्तम्-देवदत्त नावाचा शंख; धनञ्जयः धनंजय (धनावर विजय प्राप्त करणारा अर्जुन); पौण्ड्रम् पौण्डू नावाचा शंख; दध्मौ वाजविला; महाशङ्खम् भीषण शंख; भीम-कर्मा-अतिदुष्कर कर्म करणारा; वृक उदरः बेसुमार भक्षण करणारा भीम.

भगवान श्रीकृष्णांनी आपला पाञ्चजन्य नावाचा शंख वाजविला; अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजविला आणि अतिदुष्कर कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौण्ड्र नामक शंख वाजविला.

अध्याय पहिला भाग : 5 (अर्जुनविषादयोग)

तात्पर्य : भगवान श्रीकृष्ण यांचा या श्लोकामध्ये हृषीकेश म्हणून उल्लेख करण्यात आला आहे, कारण ते समस्त इंद्रियांचे स्वामी आहेत. जीव त्यांचे अंश आहेत आणि म्हणून जीवांची इंद्रिये सुद्धा त्यांच्या इंद्रियांची अंशरूपे आहेत. निर्विशेषवादी, जीवांना इंद्रिये का असतात हे समर्पकपणे सांगू शकत नसल्यामुळे ते जीवांना इंद्रियरहित किंवा निराकार असे संबोधण्यास उत्सुक असतात. सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेले भगवंत जीवांच्या इंद्रियांचे मार्गदर्शन करतात, जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियांचे मार्गदर्शन करतात पण शुद्ध भक्तांच्या बाचतीत मात्र ते स्वतः त्यांचे इंद्रिय-नियंत्रण करतात. (DRAUPADI)

Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!

या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियांचे नियंत्रण करतात, म्हणून त्यांना हृषीकेश या विशिष्ट नावाने संबोधण्यात आले आहे. भगवंतांना त्यांच्या विविध कार्यानुसार विविध नावे आहेत. उदाहरणार्थ, त्यांचे नाव मधुसूदन आहे कारण, त्यांनी मधू नामक दैत्याचा वध केला; त्यांचे नाव गोविंद आहे कारण ते गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात; त्यांचे नाव वासुदेव आहे कारण, ते वसुदेव पुत्र म्हणून अवतरित झाले; त्यांचे नाव देवकीनंदन आहे कारण, त्यांनी देवकीचा माता म्हणून स्वीकार केला; त्यांचे नाव यशोदानंदन आहे कारण, त्यांनी वृंदावनामध्ये आपल्या बाल्यलीला यशोदामातेबरोबर केल्या; त्यांचे नाव पार्थसारथी आहे कारण, आपला मित्र अर्जुन यांचा सारथी म्हणून काम केले, तसेच कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये अर्जुनाला मार्गदर्शन केले म्हणून त्यांना हृषीकेश हे नाव पडले. (DRONACHARYA)

अध्याय पहिला भाग : 5 (अर्जुनविषादयोग)

या श्लोकामध्ये अर्जुनाचा उल्लेख धनंजय म्हणून करण्यात आला आहे. कारण विविध प्रकारच्या यज्ञयागांसाठी त्याच्या थोरल्या भावाला जेव्हा धनसंपत्तीची आवश्यकता होती, तेव्हा त्याने धन एकत्रित केले. याप्रमाणे भीमाला वृकोदर म्हटले जाते कारण ज्याप्रमाणे तो हिडिंबासुराच्या वधासारखी अतिशय कठीण कार्य करू शकत होता, त्याचप्रमाणे तो अन्नभक्षणही करीत असे. (PARSHURAM)

म्हणून पांडवपक्षातील, आरंभी भगवंतांनी वाजविलेल्या आणि नंतर इतर व्यक्तींनी विविध प्रकारच्या शंखांद्वारे उत्पन्न केलेल्या शंखध्वनीमुळे सर्व सैनिक युद्धासाठी उत्सुक झाले. विरुद्ध पक्षामध्ये महत्त्वपूर्ण असे काहीच नव्हते. त्या ठिकाणी परम मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण नव्हते की लक्ष्मीदेवीही नव्हती. म्हणून युद्धामध्ये त्यांची हार निश्चित होती आणि शंखध्वनींनी हाच संदेश घोषित केला. TO BE CONTINUE….

VISIT OUR WEBSITE

"Share this post with your family and friends for more exciting knowledge."

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp