अध्याय पहिला (अर्जुन विषाद योग) Bhagavad Gita

अध्याय पहिला भाग : 6 (अर्जुनविषादयोग)

"Join our WhatsApp group and subscribe to our YouTube channel for the latest updates!"

अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः । अध्याय पहिला भाग : 6 (अर्जुनविषादयोग)

नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ।।१६।।

काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः ।

धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ।।१७।।

द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते ।

सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान्दध्मुः पृथक्पृथक् ।।१८।। (KRISHNA)

अध्याय पहिला भाग : 6 (अर्जुनविषादयोग)

अनन्त-विजयम्-अनन्तविजय नामक शंख; राजा-राजा; कुन्ती पुत्रः कौंतेय; युधिष्ठिरः– युधिष्ठिर; नकुलः नकुल, सहदेवः सहदेव आणि; सुघोष मणिपुष्पकी सुघोष आणि मणिपुष्पक नामक शंख, काश्यः काशीचा राजा; आणिः परम ईषु-आसः श्रेष्ठ धनुर्धारी; शिखण्डी-शिखंडी; -सुद्धा; महारथः सहस्र सैनिकांशी एकटाच लढू शकणारा; धृष्टद्युम्नः– धृष्टद्युम्न (राजा द्रुपदाचा पुत्र); विराटः– विराट (या राजाने पांडवांना अज्ञातवासाच्यावेळी आश्रय दिला होता); -सुद्धा; सात्यकिः सात्यकी (म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचा सारथी युयुधान्) – आणि; अपराजितः ज्याच्यावर कोणीच विजय प्राप्त करू शकला नाही; द्रुपदः पांचालदेशाचा राजा, द्रुपदः द्रौपदेयाः द्रौपदीचे पुत्र; -सुद्धा; सर्वशः सर्वजण; पृथिवी-पते हे राजन्; सौभद्रः सुभद्रापुत्र अभिमन्यूः सुद्धा महा-बाहुः विशाल भुजा असलेला; शङ्खान्-शंख; दध्मुः वाजविले; पृथक्पृथक्-वेगवगळे.

कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंतविजय नावाचा शंख वाजविला. त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नामक शंख वाजविले. हे राजन् ! महाधनुर्धर काशीनरेश, श्रेष्ठ योद्धा शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट, अपराजित सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाबाहू पुत्र व इतरांनी आपापले शंख वाजविले.

Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!

अध्याय पहिला भाग : 6 (अर्जुनविषादयोग)

तात्पर्य : संजयाने मोठ्या चातुयनि धृतराष्ट्राला सांगितले की, पांडुपुत्रांना फसविणे आणि आपल्या स्वतःच्या पुत्रांना राज्याच्या सिंहासनावर बसविण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण चुकीचे आहे व ते मुळीच स्तुत्य नाही. पूर्वलक्षणांवरून तर संपूर्ण कुरुवंश या महायुद्धामध्ये मारला जाईल, हे स्पष्टपणे कळून आले आहे. पितामह भीष्मांपासून ते अभिमन्यूसारख्या नातवंडापर्यंत, तसेच जगातील इतर सर्व राज्यांचे राजे, जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित होते, त्या सर्वांचा विनाश निश्चित होता. राजा धृतराष्ट्रामुळेच ही आपत्ती कोसळली होती. कारण त्याने आपल्या मुलांनी स्वीकारलेल्या धोरणाला उत्तेजन दिले होते.

अध्याय पहिला भाग : 6 (अर्जुनविषादयोग)

स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ।

नभश्च पृथिवीं चैव तुमुलोऽभ्यनुनादयन् ।।१९।।

सः-तो; घोषः ध्वनी; धार्तराष्ट्राणाम् धृतराष्ट्राच्या पुत्रांची; हृदयानि हृदये; व्यदारयत्– विदीर्ण केली; नभः– आकाशाला सुद्धा; पृथिवीम् पृथ्वीतल; सुद्धा एव-निश्चितच; तुमुलः – निनाद; अभ्यनुनादयन्– दुमदुमून गेला.

हा विविध प्रकारचा शंखनिनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली. (ARJUN)

अध्याय पहिला भाग : 6 (अर्जुनविषादयोग)

तात्पर्य : दुर्योधनाच्या पक्षातील भीष्म आणि इतरांनी जेव्हा शंखनाद केला, तेव्हा पांडवांची हृदये मुळीच विदीर्ण झाली नाहीत. अशा प्रकारच्या घटनांचा उल्लेख आढळत नाही; परंतु या विशिष्ट श्लोकामध्ये पांडवपक्षाच्या बाजूने करण्यात आलेल्या शंखध्वनीमुळे धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली असे सांगितले आहे. याचे कारण म्हणजे पांडव आणि त्यांचा भगवान श्रीकृष्णावरील दृढ विश्वास होय. जो भगवंतांचा आश्रय घेतो, तो महाभयानक आपत्तीमध्येही भयभीत होत नाही. (KAURAV)

Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!

अध्याय पहिला भाग : 6 (अर्जुनविषादयोग)

अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान्कपिध्वजः ।

प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ।

हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ॥२०॥

अथ त्यानंतर; व्यवस्थितान् स्थित; दृष्ट्वा पाहून; धार्तराष्ट्रान् धृतराष्ट्रपुत्र; कपि-ध्वजः ज्याच्या ध्वजावर हनुमानाचे चिन्ह आहे; प्रवृत्ते युद्ध आरंभ होण्यापूर्वी, शस्त्र-सम्पाते-बाण चालविण्यापूर्वी; धनुः धनुष्य, उद्यम्य उचलून, पाण्डवः पांडुपुत्र; हृषीकेशम् भगवान श्रीकृष्णांना; तदा-त्यावेळी; वाक्यम्-शब्द, इदम् हे; आह म्हणाला; मही-पते हे राजन्.

हनुमानाचे चिह्न असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला. हे राजन् ! व्यूहरचनेतील धृतराष्ट्रपुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढीलप्रमाणे म्हणाला. (DRAUPADI)

अध्याय पहिला भाग : 6 (अर्जुनविषादयोग)

तात्पर्य : युद्धाला आरंभ होण्यास थोडाच कालावधी होता. वरील कथनावरून समजून येते की, युद्धभूमीवर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांद्वारे मार्गदर्शित पांडवसेनेची अनपेक्षित व्यूहरचना पाहून धृतराष्ट्रपुत्र किंचित निराश झाले होते. अर्जुनाच्या ध्वजावरील हनुमानाचे चिन्ह हे विजयाचे आणखी एक लक्षण आहे. कारण राम-रावण युद्धामध्ये हनुमानाने प्रभू श्रीरामचंद्रांना सहाय्य केले होते. आता राम आणि हनुमान दोघेही अर्जुनाला सहाय्य करण्यासाठी त्याच्या रथावर आरूढ होते, भगवान श्रीकृष्ण म्हणजेच स्वतः श्रीराम आहेत आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीराम आहेत, त्या ठिकाणी त्यांचा नित्य सेवक हनुमान आणि त्यांची नित्य सहचारिणी भाग्यलक्ष्मी श्रीमती सीतादेवी उपस्थित असतात. (KALKI)

म्हणून कोणत्याही शत्रूकडून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते; आणि सर्वांत मुख्य गोष्ट म्हणजे इंद्रियांचे स्वामी स्वतः भगवान श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. याप्रमाणे अर्जुनाला युद्ध करण्यासाठी हितकारक मार्गदर्शन प्राप्त होते. आणि भगवंतांनी निर्माण केलेल्या अशा आशादायक परिस्थितीमुळे युद्धामध्ये निश्चितपणे विजयी होण्याची खात्री होती. TO BE CONTINUE….

VISIT OUR WEBSITE

"Share this post with your family and friends for more exciting knowledge."

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp