अध्याय पहिला (अर्जुन विषाद योग) Bhagavad Gita

अध्याय पहिला भाग : 7 (अर्जुनविषादयोग)

"Join our WhatsApp group and subscribe to our YouTube channel for the latest updates!"

अर्जुन उवाच अध्याय पहिला भाग : 7 (अर्जुनविषादयोग)

सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ।

यावदेतान्निरीक्षेऽहं योडुकामानवस्थितान् ।।२१।।

कैर्मया सह योद्धव्यमस्मिन्रणसमुद्यमे ।।२२।। (KRISHNA)

अध्याय पहिला भाग : 7 (अर्जुनविषादयोग)

अर्जुनः उवाच-अर्जुन म्हणाला, सेनयोः-सैन्यांच्या; उभयोः दोन्ही; मध्ये-मध्यभागीः रथम् रव; स्थापय-कृपया उभा कर; मे माझा; अच्युत हे अच्युता (कधीच पतन न होणारा) यावत् जोपर्यंत; एतान् हे सर्व; निरीक्षे पाहू शकेन; अहम् मी; योद्ध कामान् युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या; अवस्थितान् युद्धभूमीवर रचिलेल्या; कैः कोणाबरोबर; मया-मला; सह– बरोबर; योद्धव्यम्-युद्ध करावयाचे आहे; अस्मिन् या; रण-संघर्ष, युद्धः समुद्यमे प्रयत्नात, खटपटीत.

अर्जुन म्हणाला: हे अच्युत ! कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याबरोबर मला या भयंकर शखाखस्पर्धेमध्ये संघर्ष करावयाचा आहे, त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन.

Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!

अध्याय पहिला भाग : 7 (अर्जुनविषादयोग)

तात्पर्य : श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम श्री भगवान असले तरी त्यांच्या अहेतुकी कृपेमुळे ते आपल्या मित्राची सेवा करीत होते. ते आपल्या भक्तावरील प्रेमात कधीही चुकत नाहीत म्हणून त्यांना या ठिकाणी अच्युत असे संबोधण्यात आले आहे. सारथी या नात्याने त्यांना अर्जुनाच्या आदेशांचे पालन करावे लागत असे आणि हे करण्यात त्यांनी कधीच संकोच केला नाही. यासाठीच त्यांना अच्युत म्हणून संबोधण्यात आले आहे. जरी त्यांनी आपल्या भक्ताचे सारथ्य स्वीकारले होते तरी त्यांच्या परम स्थानाला कोणीच आव्हान देऊ शकत नाही. (ARJUN)

सर्व परिस्थितीत ते सर्व इंद्रियांचे स्वामी, पुरुषोत्तम श्रीभगवान हृषीकेश आहेत. भगवंत आणि त्यांचा सेवक यांच्यामधील संबंध अत्यंत मधुर आणि दिव्य असतो. सेवक हा भगवंतांची सेवा करण्यात सदैव तत्पर असतो आणि भगवंतही सतत आपल्या भक्ताची सेवा करण्याची संधीच पाहात असतात. भगवंत स्वतः आदेश देण्यापेक्षा, ते त्यांच्या शुद्ध भक्तांना स्वतःपेक्षा ज्येष्ठतेचे स्थान देऊन त्यांचा आदेश स्वीकारण्यात अधिक आनंद मिळवितात. भगवंत है स्वामी असल्याने प्रत्येकजण त्यांच्या आज्ञेखाली असतो, आणि त्यांना आज्ञा देणारा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीच नाही. परंतु जेव्हा ते पाहतात की, त्यांचा शुद्ध भक्त त्यांना आज्ञा देत आहे तेव्हा जरी ते सर्व परिस्थिर्तीत अच्युत असले तरी त्यांना दिव्यानंद प्राप्त होतो.

भगवंतांचा शुद्ध भक्त या नात्याने अर्जुनाला आपल्या भावंडांशी व चुलत्याशी युद्ध करण्याची मुळीच इच्छा नव्हती; पण दुर्योधन हट्टी असल्यामुळे आणि शांततामय वाटाघाटी करण्यास कधीच तयार नसल्यामुळे अर्जुनाला युद्धभूमीत येणे भाग पडले. यासाठीच युद्धभूमीवरील उपस्थित ज्येष्ठ व्यक्तींना पाहण्यास तो उत्सुक होता. रणांगणावर शांततेचा प्रयत्न करण्याचा जरी प्रश्नच नव्हता तरी त्या व्यक्तींना पुन्हा पाहण्याची आणि एका अनावश्यक युद्धाची मागणी करण्यात ते किती कृतनिश्चयी आहेत, हेही पाहण्याची त्याची इच्छा होती. (DRAUPADI)

अध्याय पहिला भाग : 7 (अर्जुनविषादयोग)

योत्स्यमानानवेक्षेऽहं ये एतेऽत्र समागताः ।

धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ॥२३॥

योत्स्यमानान् लढणाऱ्यांना; अवेक्षे मला पाहू दे; अहम् मी; ये जे; एते ते; अत्र येथे; समागताः– एकत्रित झालेल्या; धार्तराष्ट्रस्य धृतराष्ट्राच्या पुत्रांचे; दुर्बुद्धेः वाईट बुद्धीचा; युद्धे- युद्धात; प्रिय-प्रिय; चिकीर्षवः– इच्छिणारे,

धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खुष करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे.

अध्याय पहिला भाग : 7 (अर्जुनविषादयोग)

तात्पर्य : दुर्योधन आपला पिता धृतराष्ट्र याच्या सहकार्याने दुष्ट बेत आखून पांडवांचे राज्य बळकाविणार होता हे उघड गुपित होते. दुर्योधनाच्या बाजूला मिळालेले सर्वजण हे एकाच माळेतील मणी असले पाहिजेत. असे लोक कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि युद्धाला आरंभ होण्यापूर्वी त्यांना पाहण्याची अर्जुनाला इच्छा होती. पण शांततेच्या वाटाघाटींची बोलणी करण्याचा त्याचा मुळीच उद्देश नव्हता. शिवाय ही गोष्टही सत्य होती की, त्याच्या निकट भगवान श्रीकृष्ण विराजमान होते यामुळे अर्जुनाला विजयाची पूर्ण खात्री होती. तरी आपल्याला ज्यांच्याशी सामना करावयाचा आहे त्यांच्या बळाचा अंदाज घेण्याकरिता, त्यांना पाहण्याची त्याला इच्छा होती. (KALKI)

Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!

अध्याय पहिला भाग : 7 (अर्जुनविषादयोग)

सञ्जय उवाच

एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत।

सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ।।२४।।

सञ्जयः उवाच संजय म्हणाला; एवम् याप्रमाणे; उक्तः म्हटल्यावर, हृषीकेशः भगवान श्रीकृष्ण; गुडाकेशेन-अर्जुनाने; भारत हे भरतवंशजा; सेनयोः सैन्याच्या; उभयोः दोन्ही; मध्ये-मध्यभागी; स्थापयित्व– उभा करून; रथ-उत्तमम्-सर्वोत्तम रथ.

संजय म्हणालाः हे भरतवंशजा! या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला.

अध्याय पहिला भाग : 7 (अर्जुनविषादयोग)

तात्पर्य : या श्लोकात अर्जुनाला गुडाकेश म्हणून संबोधण्यात आले आहे. गुडाका म्हणजे निद्रा आणि जो निद्रेवर विजय प्राप्त करतो त्याला गुडाकेश म्हटले जाते. निद्रा याचा अर्थ अज्ञान असाही होतो. अर्जुनाने श्रीकृष्णांशी असलेल्या त्याच्या सख्यत्वामुळे निद्रा आणि अज्ञान दोन्हीवरही विजय प्राप्त केला होता. श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त असल्यामुळे तो श्रीकृष्णांना क्षणभरही विसरू शकत नव्हता कारण भक्तांचा हाच खरा स्वभाव असतो. (MAHABHARAT)

निद्रिस्त अथवा जागृत अवस्थेमध्ये भगवद्भक्त हा भगवान श्रीकृष्ण, त्यांचे नाम, रूप, गुण आणि लीला यांचे चिंतन करण्यापासून दूर राहूच शकत नाही. अशा रीतीने, श्रीकृष्णांचे सतत स्मरण करून कृष्णभक्त हा अज्ञान आणि निद्रा यावर विजय प्राप्त करू शकतो. यालाच ‘कृष्णभावना’ किंवा समाधि असे म्हणतात. हृषीकेश किंवा प्रत्येक जीवाचे मन आणि इंद्रिय यांचे मार्गदर्शक या नात्याने दोन्ही सैन्यांच्या मधोमध रथ उभा करण्याचा अर्जुनाचा उद्देश ते जाणू शकले. पुढे ते अर्जुनाला म्हणाले. TO BE CONTINUE….

VISIT OUR WEBSITE

"Share this post with your family and friends for more exciting knowledge."

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp