भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् । अध्याय पहिला भाग : 8 (अर्जुनविषादयोग)
उवाच पार्थ पश्यैतान्समवेतान्कुरूनिति ।। २५।। (KRISHNA)
अध्याय पहिला भाग : 8 (अर्जुनविषादयोग)
भीष्म पितामह भीष्म; द्रोण- द्रोणाचार्य; प्रमुखतः च्या समोर; सर्वेषाम् सर्व; च सुद्धा; मही– क्षिताम्-जगातील राजे; उवाच म्हणाले; पार्थ हे पार्थ; पश्य पाहाः एतान् या सर्वांनां; समवेतान्-एकत्रित; कुरून् – कुरुवंशातील सदस्य; इति-याप्रमाणे.
भीष्म, द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले, हे पार्थ! येथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना आता पहा.
तात्पर्य : सर्व जीवांचे परमात्मास्वरूप असल्याने भगवान श्रीकृष्ण, अर्जुनाच्या मनात काय चालले होते ते जाणू शकले. या संदर्भात हृषीकेश या शब्दप्रयोगावरून कळून येते की, त्यांना सर्व काही ज्ञात होते. आणि अर्जुनाच्या संदर्भात ‘पार्थ’ किंवा कुंतीपुत्र अथवा पृथेचा पुत्र हा शब्द सुद्धा तितकाच महत्त्वपूर्ण आहे. मित्र या नात्याने श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगावयाचे होते की, अर्जुन हा त्यांच्या आत्येचा म्हणजेच पृथेचा पुत्र असल्यामुळे त्यांनी अर्जुनाचा सारथी होण्याचे मान्य केले आहे. अर्जुनाला आता ‘उपस्थित कुरुवंशीयांकडे पहा,’ असे सांगण्यामागे श्रीकृष्णांचा काय उद्देश होता? अर्जुनाला तेथेच थांबून युद्ध करावयाचे नव्हते का? श्रीकृष्णांनी आपली आत्या, पृथा हिच्या पुत्रांकडून अशी अपेक्षा कधीच केली नव्हती. मित्रसुलभ विनोद करून अशा प्रकारे श्रीकृष्णांनी अर्जुनाचे मन पूर्वीच ओळखले होते. (ARJUN)
Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!
अध्याय पहिला भाग : 8 (अर्जुनविषादयोग)
तत्रापश्यत्स्थितान्पार्थः पितृनथ पितामहान् ।
आचार्यान्मातुलान्भ्रातृन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा ।
श्वशुरान्सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ।। २६।।
तत्र-त्या ठिकाणी; अपश्यत्-त्याने पाहिले; स्थितान् उभे असलेले; पार्थः अर्जुन; पितृन्– वाडवडील; अथ सुद्धाः पितामहान् पितामह; आचार्यान् गुरू, शिक्षक; मातुलान्-मामे; भ्रातृन्-भाऊ; पुत्रान् पुत्र; पौत्रान् नातवंडे; सखीन् मित्र; तथा तसेचः श्वशुरान्-सासरे; सुहृदः हितचिंतकः च सुद्धा एव निश्चितः सेनयोः सैन्यामध्ये; उभयोः दोन्ही पक्षांमधील; अपि-सहित.
त्या ठिकाणी दोन्ही पक्षांकडील सैन्यांमध्ये, आपले वाडवडील, आजे, शिक्षक, मामे, भाऊ, पुत्र, नातवंडे, मित्र तसेच सासरे व हितचिंतक अर्जुनाने पाहिले.
अध्याय पहिला भाग : 8 (अर्जुनविषादयोग)
तात्पर्य : अर्जुनाने रणांगणावर आपले सर्व नातेवाईक पाहिले. त्याने भूरिश्रवासारख्या आपल्या वडिलांच्या समवयस्क व्यक्तींना, पितामह भीष्म आणि सोमदत्त, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांच्यासारखे गुरू, शल्य आणि शकुनी यांच्यासारखे मामा, दुर्योधनासारखे भाऊ, लक्ष्मणासारखे पुत्र, अश्वत्थामासारखे मित्र, कृतवर्मासारखे हितचिंतक, इत्यादी सर्व व्यक्तींना पाहिले. त्याने सैन्यात उपस्थित असलेल्या आपल्या मित्रांनाही पाहिले. (KAURAV)
तान्समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्बन्धूनवस्थितान् ।
कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत् ।।२७।।
अध्याय पहिला भाग : 8 (अर्जुनविषादयोग)
तान्-त्या सर्वांना; समीक्ष्य पाहून; सः तो; कौन्तेयः कुंतीपुत्र अर्जुन; सर्वान् सर्व प्रकारच्या; बन्धून्-नातेवाईकांना; अवस्थितान् उभे असलेल्या; कृपया करुणेने; परया अत्यंत; आविष्टः व्याकूळ झालेल्या; विषीदन् शोकाकूल झाला असताना; इदम् याप्रमाणे; अब्रवीत् म्हणाला.
जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व प्रकारच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला. (VED)
अर्जुन उवाच
दृष्द्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् ।
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ॥ २८॥
अध्याय पहिला भाग : 8 (अर्जुनविषादयोग)
अर्जुनः उवाच-अर्जुन म्हणाला; दृष्द्धा पाहून; इमम्-या सर्व; स्व-जनम्-नातेवाईक, सगेसोयरे; कृष्ण-हे कृष्ण; युयुत्सुम्-युद्धोत्सुक झालेल्या सर्वांनाः समुपस्थितम् उपस्थित; सीदन्ति-कंप सुटतो; मम्-माझ्या; गात्राणि शरीराच्या अवयवांना; मुखम् मुख; च-सुद्धा; परिशुष्यति– कोरडे पडत आहे.
अर्जुन म्हणाला: हे कृष्ण! या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे. (DRAUPADI)
Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!
अध्याय पहिला भाग : 8 (अर्जुनविषादयोग)
तात्पर्य : भगवंतांवर ज्या व्यक्तीची प्रामाणिक भक्ती आहे त्या व्यक्तीकडे, देवदेवता आणि सत्पुरुषांच्या ठिकाणी आढळणारे सर्व सद्गुण आढळतात. पण जो अभक्त आहे तो भौतिकदृष्ट्या शिक्षण आणि सुसंस्कृती याद्वारे कितीही प्रगत असला तरी त्याच्याकडे दैवी सद्गुणांचा अभावच असतो. अर्जुनाने जेव्हा आपापसांत युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन युद्धभूमीवर जमलेल्या आपल्या मित्रांना, सगेसोयऱ्यांना आणि नातेवाईकांना पाहिले, तेव्हा तो त्यांच्याबद्दलच्या करुणेने अत्यंत व्याकूळ झाला. (KALKI)
आपल्या सैनिकांबद्दल तर त्याला पूर्वीपासूनच सहानुभूती वाटत होती आणि आता विरुद्ध पक्षाकडील सैनिकांचा अटळ मृत्यू पाहून त्याला त्यांच्याबद्दलही करुणा वाटली. या प्रकारे विचार करीत असताना त्याच्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला व तोंड कोरडे पडले. त्यांची युद्ध करण्याची उत्सुकता पाहून तो काहीसा आश्चर्यचकित झाला होता. वस्तुतः संपूर्ण कुटुंब, अर्जुनाचे रक्ताचे नातेवाईकही त्याच्याशी लढण्यासाठी जमले होते. (MAHABHARAT)
जरी या ठिकाणी उल्लेख केला नसला तरी एखादा सहज कल्पनेने समजू शकेल की, फक्त अर्जुनाच्या शरीराच्या अवयवांना कंप सुटत होता आणि मुख कोरडे पडत होते; एवढेच नव्हे, तर तो करुणेने अश्रूसुद्धा ढाळत होता. ही लक्षणे अर्जुनाच्या दुर्बलतेमुळे नव्हती, तर भगवंतांच्या शुद्ध भक्ताच्या ठिकाणी आढळणाऱ्या सहृदयतेमुळे होती. म्हणून म्हटले आहे की,
यस्यास्ति भक्तिर्भगवत्यकिंचना सर्वैर्गुणैस्तत्र समासते सुराः ।
हरावभक्तस्य कुतो महद्गुणा मनोरथेनासति धावतो बहिः ॥
“ज्याला पुरुषोत्तम श्रीभगवान यांच्याविषयी दृढ भक्ती आहे त्याच्याकडे देवतांमध्ये आढळणारे सर्व सद्गुण असतात. पण जो भगवद्भक्त नाही त्याच्याकडे काहीच किंमत नसलेली केवळ भौतिक पात्रता असते. याचे कारण म्हणजे मानसिक स्तरावरच अडकून पडल्यामुळे तो मोहमयी भौतिक शक्तीकडे निश्चितपणे आकर्षिला जातो.” (श्रीमद्भागवत ५.१८.१२) TO BE CONTINUE….