यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः । अध्याय पहिला भाग : 11 (अर्जुनविषादयोग)
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् ॥ ३७॥
कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् ।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्धिर्जनार्दन ॥३८॥
अध्याय पहिला भाग : 11 (अर्जुनविषादयोग)
यदि-जर; अपि-सुद्धा; एते-है लोक; न-नाही; पश्यन्ति-पाहतात; लोभ-लोभाने; उपहत-व्याप्त झालेले; चेतसः-त्यांचे हृदय; कुल-क्षय कुलनाशाने; कृतम्-होणारा; दोषम्-दोष; मित्र-द्रोहे-मित्रांशी भांडण करून; च-सुद्धा; पातकम्-पापकर्म; कथम्-का; न-नाही; ज्ञेयम्– जाणणे; अस्माभिः– आम्ही; पापात्-पापांपासून; अस्मात्-या; निवर्तितुम्-थांबविण्यासाठी; कुल-क्षय-कुळाचा नाश; कृतम्-झाल्याने; दोषम्-अपराध, गुन्हा; प्रपश्यद्धिः-पाहू शकणारे; जनार्दन-हे कृष्ण.
हे जनार्दन ! जरी लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना आपल्या कुटुंबाची हत्त्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरीसुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावे ? (SANATAN)
अध्याय पहिला भाग : 11 (अर्जुनविषादयोग)
तात्पर्य : एखाद्या क्षत्रियाला विरुद्ध पक्षाने युद्धासाठी किंवा द्यूत-क्रीडेसाठी निमंत्रित केले तर त्याने ते नाकारणे योग्य नसते. अशा बंधनामुळे अर्जुन युद्ध करण्यास नकार देऊ शकला नाही. कारण, दुर्योधनाच्या पक्षाने त्याला युद्ध करण्यासाठी आव्हान दिले होते. या संदर्भात अर्जुनाने विचार केला की, अशा आव्हानाच्या परिणामाबद्दल विरुद्ध पक्ष हा अज्ञानी असावा. परंतु अर्जुन त्याचे दुष्परिणाम पाहू शकत होता. म्हणूनच ते आव्हान तो स्वीकारू शकत नव्हता. बंधनाचा परिणाम जेव्हा चांगला असतो, तेव्हा असे बंधन अनिवार्य ठरू शकते. पण अशा बंधनांचा परिणाम जेव्हा अनिष्ट असतो तेव्हा ते अनिवार्य किंवा बंधनकारक ठरविता येत नाही. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच अर्जुनाने युद्ध न करण्याचे ठरविले. (MAN)
Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!
अध्याय पहिला भाग : 11 (अर्जुनविषादयोग)
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः ।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ।।३९।।
कुल-क्षये-कुळाचा नाश होण्यामुळे; प्रणश्यन्ति-नष्ट होतात; कुलधर्माः-कुलधर्म, वंशपरंपरा; सनातनाः-शाश्वत; धर्मे-धर्म; नष्टे-नष्ट झाल्यावर; कुलम्-कुळाचे; कृत्स्नम्-संपूर्ण, सर्व; अधर्मः– अधर्म; अभिभवति-बदल होतो; उत-असे म्हटले जाते.
कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंशपरंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते.
अध्याय पहिला भाग : 11 (अर्जुनविषादयोग)
तात्पर्य : कुटुंबातील व्यक्तींचे योग्य संवर्धन होऊन त्यांना आध्यात्मिक मूल्यांची प्राप्ती होण्यास सहाय्यक अशा धार्मिक परंपरेबद्दलची अनेक तत्त्वे वर्णाश्रमसंस्थेच्या पद्धतीमध्ये सोगण्यात आली आहेत. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणाऱ्या सर्व पवित्र संस्कारांसाठी कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती जबाबदार असतात. पण अशा ज्येष्ठ व्यक्तींच्या मृत्यूमुळे कुटुंबातील वंशपरंपरागत संस्कार नष्ट होतात. यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य अधार्मिक गोष्टी करण्यास प्रवृत्त होऊ शकतात आणि आपल्या आध्यात्मिक मुक्तीची संधीही गमावू शकतात. म्हणून कोणत्याही कारणासाठी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची हत्त्या होऊ देऊ नये. (MAHABHARAT)
अध्याय पहिला भाग : 11 (अर्जुनविषादयोग)
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलखियः ।
स्त्रीषु दुष्टासु वाष्र्णेय जायते वर्णसङ्करः ॥४०॥
अधर्म-अधर्म; अभिभवात्-प्रबळ झाला असता; कृष्ण-हे कृष्णः प्रदुष्यन्ति-दूषित होतात, बिघडतात; कुलखियः-कुळातील खिया; स्त्रीषु-श्री जातीपासून; दुष्टासु-अशा रीतीने बिघडल्या म्हणजे; वाष्र्णेय-हे वृष्णीच्या वंशजा, हे श्रीकृष्ण; जायते– उत्पन्न होतात; वर्णसङ्करः– अवांछित प्रजा, नको असलेली संतती. (SHANTI)
हे कृष्ण ! कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे खी जातीचे पतन झाल्यामुळे, हे वृष्णीवंशजा ! अवांछित संतती उत्पन्न होते.
अध्याय पहिला भाग : 11 (अर्जुनविषादयोग)
तात्पर्य : जीवनातील शांती, भरभराट आणि आध्यात्मिक प्रगती यांसाठी समाजामधील सभ्य लोकांची संख्या ही मूलभूत आधार आहे. राष्ट्राच्या आणि समस्त लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य आणि चांगल्या लोकांची समाजामध्ये संख्या वाढावी यासाठीच वर्णाश्रमधर्मातील मूळ तत्त्वांची रचना करण्यात आली आहे. अशी सभ्य संतती खीजातीच्या पावित्र्यावर आणि एकनिष्ठतेवर अवलंबून असते. (VED)
ज्याप्रमाणे मुले ही वाममार्गाला लागू शकतात त्याचप्रमाणे स्त्रियांचे अधःपतनही सहजपणे घडू शकते. म्हणून लहान मुले, स्त्रिया तसेच या दोघांनाही कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून संरक्षणाची आवश्यकता असते. विविध धार्मिक व्रतवैकल्ये करण्यात मग्न राहिल्यास स्त्रिया व्यभिचाराच्या वाममार्गाकडे जाण्यास प्रवृत्त होणार नाहीत. चाणक्य पंडितांच्या मताप्रमाणे सामान्यतः स्त्रिया फार बुद्धिमान नसतात आणि त्यामुळे विश्वासूही नसतात म्हणून वंशपरंपरागत विविध धार्मिक कार्यांमध्ये त्यांना सतत व्यस्त ठेवणे आवश्यक असते. (KALKI)
या प्रकारे त्यांच्या पावित्र्यामुळे आणि भक्तीमुळे वर्णाश्रमधर्मामध्ये सहभाग घेण्यास पात्र अशा चांगल्या संततीची निर्मिती होईल. अशा वर्णाश्रम-धर्माच्या अभावामुळे साहजिकच लिया पुरुषांबरोबर कार्य करण्यात आणि त्यांच्यामध्ये मिसळण्यास स्वतंत्र बनतात. व्यभिचाराला अशी मोकळीक मिळाली की अनावश्यक लोकसंख्या वाढण्याची शक्यता वाढते. बेजबाबदार व्यक्तीसुद्धा समाजामध्ये व्यभिचाराला उत्तेजन देतात आणि त्यामुळे मनुष्यजातीमध्ये अनावश्यक संततीची बेसुमार वाढ होते आणि युद्ध, महामारीचे संकट बळावते. (DRAUPADI)
Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!
अध्याय पहिला भाग : 11 (अर्जुनविषादयोग)
सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च।
पतन्ति पितरो होषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ॥४१॥
सङ्करः-अशी अनावश्यक संतती; नरकाय-नरकजीवनास कारणीभूत ठरतात; एवनिश्चितः कुल-घ्नानाम्-कुळाचा घात करणाऱ्यांना; कुलस्य-कुळासाठी; च-सुद्धाः पतन्ति-पत्तन पावतात; पितरः-पितृगण; हि-खचित; एषाम्-त्यांचे; लुप्त-लोप झाल्यामुळे; पिण्ड-पिंड किंवा अन्न अर्पण करणे; उदक-आणि पाणी; क्रियाः-क्रिया.
अनावश्यक संततीच्या वाढीमुळे, कुळ तसेच कुळपरंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी, निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जलअर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते.
अध्याय पहिला भाग : 11 (अर्जुनविषादयोग)
तात्पर्य : सकाम कर्माच्या विधिविधानांनुसार कुळातील पूर्वजांना ठराविक वेळी जल आणि पिंडदान करणे आवश्यक असते. विष्णुपूजेने ही अर्पणक्रिया सिद्ध होते. कारण श्रीविष्णूंना अर्पण केलेला नैवेद्य नंतर प्रसाद म्हणून खाल्ल्याने मनुष्याचा सर्व प्रकारच्या पापकर्मांतून उद्धार होतो. कधीकधी विविध प्रकारच्या पापकर्मांमुळे पूर्वज दुःख भोगत असतील आणि कधीकधी तर त्यांच्यापैकी काहीजण स्थूल भौतिक शरीराची सुद्धा प्राप्ती करू शकत नाहीत व यामुळे त्यांना सूक्ष्म शरीरामध्येच भूतपिशाच्च म्हणून राहणे भाग पडते. (ARJUN)
म्हणून वंशज जेव्हा प्रसादरूपी अन्न आपल्या पूर्वजांना अर्पण करतात तेव्हा पूर्वजांची दुःखमय अशा भूतपिशाच्च योनीतून किंवा कष्टमय जीवनातून मुक्तता होते. अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना मदत करणे ही वंशपरंपरा असते. भक्तिमार्गाचा अवलंब न करणाऱ्यांना याप्रकारचे कर्मकांड करणे अत्यावश्यक असते. जो भक्तिमार्गाशी संलग्न आहे त्याला अशा प्रकारचे कर्मकांड करण्याची गरज नाही. केवळ भक्तिमय सेवा करून एखादा शेकडो आणि हजारो पूर्वजांची सर्व प्रकारच्या कष्टांतून मुक्तता करू शकतो. श्रीमद्भागवतात (११.५.४१) सांगण्यात आले आहे कीः (KRISHNA)
देवर्षि भूताप्तनृणां पितृणां न किंकरो नायमृणी च राजन् ।
सर्वात्मना यः शरणं शरण्यं गतो मुकुन्दं परिहृत्य कर्तम् ।।
“ज्याने सर्व प्रकारच्या बंधनांचा त्याग करून मोक्षदात्या श्रीमुकुंद यांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला आहे आणि पूर्ण प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने भक्तिमार्गाचा अंगिकार केला आहे त्याची देवदेवता, ऋषिमुनी, इतर जीव, कुटुंबातील सदस्य, मानवता आणि पूर्वज यांच्यासंबंधी कोणतीही कर्तव्ये किंवा ऋणे फेडण्याची बंधने राहात नाहीत.” पुरुषोत्तम श्रीभगवान यांची प्रेममयी सेवेद्वारे भक्ती केल्याने अशा सर्व कर्तव्यांची आपोआपच पूर्तता होते. TO BE CONTINUE….