अध्याय पहिला (अर्जुन विषाद योग) Bhagavad Gita

अध्याय पहिला भाग : 12 (अर्जुनविषादयोग)

"Join our WhatsApp group and subscribe to our YouTube channel for the latest updates!"

दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः । अध्याय पहिला भाग : 12 (अर्जुनविषादयोग)

उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः ॥४२।।

दोषैः-अशा दोषांमुळे; एतैः या सर्व; कुल-घ्नानाम् कुलघातकी किंवा कुटुंब नष्ट करणारे; वर्ण-सङ्कर-अवांछित संतती; कारकैः जी मूळ किंवा कारणीभूत आहेत; उत्साद्यन्ते-उध्वस्त होतात; जातिधर्माः- जातियोजना, सामुदायिक योजना; कुल-धर्माः कुलपरंपरा; च-सुद्धा; शाश्वताः- सनातन. (SANATAN)

वंशपरंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दुष्ट कृत्यांमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंबकल्याणाची सर्व कार्ये उध्वस्त होतात.

अध्याय पहिला भाग : 12 (अर्जुनविषादयोग)

तात्पर्य : सनातन धर्म किंवा वर्णाश्रमधर्म संस्थेने, मनुष्य अंतिम मोक्षाची प्राप्ती करण्यास समर्थ होऊ शकेल अशा पद्धतीने मानव समाजातील चार विभागांना अनुसरून सामुदायिक योजना तसेच कुटुंबकल्याणार्थ कार्यांची योग्य रचना करून दिली आहे. म्हणून बेजबाबदार पुढाऱ्यांनी सनातनधर्माच्या परंपरेचा भंग केल्यास समाजामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे, श्रीविष्णूंची प्राप्ती हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे याचा लोकांना विसर पडतो. अशा पुढाऱ्यांना अंघ म्हटले जाते आणि जे लोक अशा नेत्यांचे अनुसरण करतात ते निश्चितपणे गोंधळून जातात. (MAN)

उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।

नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥४३॥

उत्सन्न-विनाश झालेल्या; कुलधर्माणाम् ज्यांना कुलपरंपरा आहेत ते; मनुष्याणाम्-अशा मनुष्यांचे; जनार्दन हे कृष्ण; नरके नरकात; नियतम्-नित्य, नेहमी; वासः निवासः भवति- असे होते; इति-या प्रकारे; अनुशुश्रुम-गुरुशिष्यपरंपरेद्वारे मी ऐकले आहे.

हे प्रजापालक! हे कृष्ण! गुरुशिष्यपरंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की, कुलपरंपरेचा विध्वंस करणारे नरकातच नित्य निवास करतात. (MAHABHARAT)

Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!

अध्याय पहिला भाग : 12 (अर्जुनविषादयोग)

तात्पर्य : अर्जुनाचा युक्तिवाद त्याच्या वैयक्तिक अनुभवावर नव्हे तर त्याने आचार्यांकडून जे ऐकले होते त्यावर आधारित होता. वास्तविक ज्ञानप्राप्तीचा हाच मार्ग आहे. अशा ज्ञानात प्रथमपासूनच स्थित झालेल्या योग्य व्यक्तीच्या मदतीशिवाय वास्तविक ज्ञानाच्या अंतिम ध्येयाकडे पोहोचता येत नाही. वर्णाश्रमसंस्थेतील एका पद्धतीनुसार मनुष्याला मृत्युपूर्वी आपल्या पापकर्माचे प्रायश्चित करण्यासाठी विशिष्ट विधी करावा लागतो. जो नेहमी पापकर्मच करण्यात गुंतला आहे त्याने या प्रायश्चित्त विधीचा उपयोग करून घेतलाच पाहिजे. असे न केल्यास त्या व्यक्तीला पापकर्माचे फळ म्हणून दुःखमय, कष्टमय जीवन भोगण्यासाठी निश्चितपणे नरकात घातले जाते. (SHANTI)

अध्याय पहिला भाग : 12 (अर्जुनविषादयोग)

अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् ।

यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ।।४४।।

अहो अरेरे!; बत-किती चमत्कारिक आहे; महत्-मोठे; पापम् पाप; कर्तुम्-करण्यास; व्यवसिताः-निर्णय घेतला आहे किंवा ठरविले आहे; वयम्-आम्ही; यत् कारण की; राज्य- सुख-लोभेन-राज्यसुखाच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे; हन्तुम्-हत्त्या करण्यासाठी; स्वजनम् नातलगांना; उद्यताः- तयार झालो आहोत. (VED)

अरेरे! आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत हे किती चमत्कारिक आहे! राज्यसुख भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास तयार झालो आहोत.

तात्पर्य : स्वार्थी हेतूने प्रेरित झाल्यामुळे मनुष्य आपल्या स्वतःच्या बंधूंची, पित्याची अथवा मातेचीही हत्त्या करण्याइतके पापकर्म करण्यास प्रवृत्त होऊ शकतो. जगाच्या इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत. पण अर्जुन हा भगवंतांचा साधुवृत्तियुक्त भक्त असल्यामुळे त्याला नेहमी नैतिक तत्त्वांची जाणीव असे व म्हणून तो अशी कर्मे करण्याचे टाळत असे.

अध्याय पहिला भाग : 12 (अर्जुनविषादयोग)

यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः ।

धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ।।४५।।

यदि जरी; माम्-मी; अप्रतीकारम्-प्रतिकार न करता; अशस्त्रम्-पूर्ण शस्त्रसज्ज न होता; शस्त्रपाणयः-शस्त्रधारी; धार्तराष्ट्राः धृतराष्ट्राचे पुत्र; रणे युद्धभूमीवर; हन्युः- मारतील; तत्-ते; मे-मला; क्षेमतरम्-अधिक चांगले, योग्य; भवेत्-होईल.

शस्त्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी माझ्यासारख्या निःशस्त्र आणि प्रतिकार न करणाऱ्याची हत्त्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल. (KALKI)

तात्पर्य : युद्धाला तयार नसलेल्या व निःशस्त्र असलेल्या शत्रूवर हल्ला करू नये हा क्षत्रियांच्या युद्धतत्त्वांमधील एक नियम आहे. अशा विचित्र परिस्थितीमध्येसुद्धा शत्रूने जरी हल्ला केला तरीही अर्जुनाने प्रतिकार करण्याचा निर्णय घेतला. विरुद्ध पक्ष युद्ध करण्यासाठी किती उत्सुक आहे याचा विचारही अर्जुनाने केला नाही. भगवंतांचा महान भक्त असल्यामुळे तो सहृदय होता व त्यामुळेच त्याच्यामध्ये ही लक्षणे दिसून येत होती. (DRAUPADI)

Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!

अध्याय पहिला भाग : 12 (अर्जुनविषादयोग)

सञ्जय उवाच

एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् ।

विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥४६।।

सञ्जय उवाच-संजय म्हणाला; एवम् याप्रमाणे; उक्त्वा बोलून; अर्जुनः अर्जुन; संख्ये- रणभूमीवर; रथ-रथात; उपस्थे आसनावर; उपाविशत्-खाली बसला; विसृज्य-बाजूला ठेवून; स-शरम्-बाणांसहित; चापम्-धनुष्य; शोक-शोकाने; संविग्न पीडित, उद्विग्र, शोकाकुल; मानसः- मनामध्ये.

संजय म्हणालाः रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये खाली बसला. (KRISHNA)

तात्पर्य : आपल्या शत्रूच्या व्यूहरचनेचे अवलोकन करताना अर्जुन रथामध्ये उभा होता. पण तो शोकाने इतका व्याकूळ झाला की, आपले धनुष्यबाण बाजूला ठेवून तो पुन्हा खाली बसला. भगवद् भक्तीमधील अशी दयाशील आणि सहृदय व्यक्ती आत्मज्ञान प्राप्त करण्यास सर्व प्रकारे योग्य आहे. (ARJUN)

याप्रकारे भगवद् गीतेच्या ‘अर्जुनविषादयोग’ या पहिल्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.

अध्याय पहिला संपन्न

VISIT OUR WEBSITE

"Share this post with your family and friends for more exciting knowledge."

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp