वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षच जायते । अध्याय पहिला भाग : 9 (अर्जुनविषादयोग)
गाण्डीवं संसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते ॥२९॥
अध्याय पहिला भाग : 9 (अर्जुनविषादयोग)
वेपथुः शरीराचे कंपन; च-सुद्धा शरीरे-शरीराला मे-माझ्या; रोम-हर्षः-रोमांचित होणे; च– सुद्धा; जायत-उठले आहेत; गाण्डीवम्-अर्जुनाचे धनुष्य; संसते-गळू लागले आहे; हस्तात्– हातातून; त्वक्-त्वचा; च-सुद्धा एव-खचित; परिदहाते-दाह होत आहे.
माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे, माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत, हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे. (KRISHNA)
अध्याय पहिला भाग : 9 (अर्जुनविषादयोग)
तात्पर्य : शरीराचे दोन प्रकारे कंपन होऊ शकते आणि रोमांचही शरीरावर दोन प्रकारे उभे राहू शकतात. अशा घटना एकतर आध्यात्मिक भावोत्कटतेमुळे होऊ शकतात किंवा भौतिक परिस्थितीमधील अतिभयामुळे होऊ शकतात. दिव्य साक्षात्कारामध्ये भीती आजिबात नसते. या परिस्थितीतील अर्जुनाची लक्षणे ही जीवित हानीच्या भौतिक भयामुळे प्रकट झाली होती.
इतर लक्षणांवरूनही हे स्पष्टपणे कळून आले. तो इतका अधीर झाला की, त्याचे प्रसिद्ध गांडीव धनुष्य त्याच्या हातातून गळून पडले आणि अंतःकरणात दाह होत असल्यामुळे त्याला आपल्या त्वचेचाही दाह होत आहे असे वाटू लागले. जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेमुळे अथवा देहात्मबुद्धीमुळे या सर्व गोष्टी घडतात. (ARJUN)
Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!
अध्याय पहिला भाग : 9 (अर्जुनविषादयोग)
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ।
निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।।३०।।
न-नाही; च-सुद्धा; शक्नोमि-समर्थ आहे किंवा शक्य आहे. अवस्थातुम्-उभा राहण्यास; भ्रमति-विसरत आहे; इव-प्रमाणे; च-आणि; मे-माझे; मनः-मन; निमित्तानि-कारणे; च-सुद्धा; पश्यामि-मी दिसते; विपरीतानि-विपरीत; केशव हे केशी दैत्याचा संहार करणारे श्रीकृष्ण.
मला येथे यापुढे थोडा वेळसुद्धा उभे राहणे शक्य नाही. मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे. हे केशव, हे कृष्णा! मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत.
अध्याय पहिला भाग : 9 (अर्जुनविषादयोग)
तात्पर्य : अर्जुनाचे धैर्य नाहीसे झाल्यामुळे तो युद्धभूमीवर उभा राहू शकत नव्हता आणि मनाच्या या प्रकारच्या दुबळेपणामुळे त्याला स्वतःचाच विसर पडत होता. भौतिक गोष्टींवरील आत्यंतिक आसक्ती मनुष्याला या गोंधळलेल्या अवस्थेत टाकते. भयं द्वितीयाभिनिवेशतः स्यात्। (श्रीमद्भागवत ११.२.३७). ज्या व्यक्तींवर भौतिक परिस्थितीचा आत्यंतिक प्रभाव झालेला असतो त्या व्यक्तींमध्ये या प्रकारचे भय आणि मानसिक असंतुलन आढळून येते. (VED)
अर्जुनाला रणभूमीमध्ये विपरीत अशा दुःखमयी घटनाच दिसत होत्या व यामुळे शत्रूवर विजय मिळवूनही तो आनंदी होणार नव्हता. निमित्तानि विपरीतानि हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत. जेव्हा एखाद्या मनुष्याला आपल्या अपेक्षा निष्फळच होणार आहेत असे दिसून येते तेव्हा तो विचार करतो की ‘मी येथे असण्याचे कारण काय?’ प्रत्येकाला स्वतःमध्ये आणि आपल्या स्वतःच्या कल्याणामध्येच आस्था असते, परमात्म्याबद्दल कोणालाच आस्था नाही. (DRAUPADI)
श्रीकृष्णांच्या इच्छेनुसारच अर्जुन स्वतःच्या वास्तविक स्वार्थाबद्दल अज्ञान दाखवीत होता. एखाद्याचा वास्तविक स्वार्थ श्रीविष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे. बद्ध जीवाला याचा विसर पडतो म्हणून त्याला भौतिक दुःखे भोगावी लागतात. अर्जुनाला वाटले की, युद्धातील त्याचा विजय हा केवळ त्याच्या शोकालाच कारणीभूत ठरेल. (KALKI)
Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!
अध्याय पहिला भाग : 9 (अर्जुनविषादयोग)
1न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ।
2न काङ्गे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।। ३१॥
न-नाही; च-सुद्धा; श्रेयः-कल्याण; अनुपश्यामि-मला दिसत आहे; हत्वा-ठार मारून; स्वजनम्-आपल्या नातलगांना; आहवे-युद्धात; न-नाही; काड्हें-इच्छितो; विजयम्-विजयाची; कृष्ण-हे कृष्ण; न-नाही; च-सुद्धा; राज्यम्-राज्य; सुखानि-त्याचे सुख; च-सुद्धा.
या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे, कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही, आणि हे कृष्ण! त्यापासून प्राप्त होणारे विजयसुख आणि राज्य याची इच्छादेखील मी करू शकत नाही.
अध्याय पहिला भाग : 9 (अर्जुनविषादयोग)
तात्पर्य : स्वतःचा वास्तविक स्वार्थ हा श्रीविष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे, याचे बद्ध जीवांना अज्ञान असते. यासाठीच ते शारीरिक संबंधांमुळे आकर्षित होतात. कारण अशा संबंधांमुळेच आपण आनंदी होऊ शकू असे त्यांना वाटते. जीवनाबद्दलच्या अशा अंघ कल्पनेमुळे त्यांना भौतिक सुखाच्या कारणांचाही विसर पडतो. (MAHABHARAT)
अर्जुनाला क्षत्रियांच्या नीतिमूल्यांचासुद्धा विसर पडल्याचे दिसून येते. असे सांगितले जाते की, दोन प्रकारच्या व्यक्ती, उदाहरणार्थ, श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष आज्ञेनुसार युद्धभूमीमध्ये लढतालढता मृत्यू पावणारा क्षत्रिय आणि आध्यात्मिक जीवनाला पूर्णपणे वाहून घेतलेला संन्यासी, या दोन प्रकारच्या व्यक्ती मृत्यूनंतर शक्तिमान आणि देदिप्यमान अशा सूर्यलोकामध्ये प्रवेश करण्यास पात्र होतात. नातलगांची तर सोडाच, पण स्वतःच्या शत्रूचीही हत्त्या करण्यास अर्जुन टाळाटाळ करीत आहे.
ज्याप्रमाणे एखाद्याला भूक नसेल तर त्याचा स्वयंपाक करण्याकडे कल नसतो त्याचप्रमाणे अर्जुन युद्ध करू इच्छित नव्हता. कारण त्याला वाटत होते की, स्वतःच्या नातलगांची हत्त्या करून जीवनामध्ये काहीच आनंद नाही. आता त्याने वनामध्ये जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन जगण्याचा निर्णय घेतला होता. क्षत्रियांना इतर कोणताही व्यवसाय स्वीकारता येत नसल्याने क्षत्रिय या नात्याने त्याला स्वतःच्या अस्तित्वाकरिता एका राज्याची आवश्यकता ही होतीच. (SANATAN)
तथापि, अर्जुनाकडे राज्यच नव्हते. आपल्या चुलत्यांशी व बांधवांशी युद्ध करणे आणि आपल्या पित्याद्वारे वारसाने चालत येणाऱ्या राज्यावर पुन्हा हक्क सांगून ते राज्य प्राप्त करण्याची एकमात्र संधी अर्जुनाकडे होती. पण असे करणे अर्जुनाला आवडत नव्हते. म्हणून तो स्वतःला, वनात जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन व्यतीत करण्यास योग्य समजत आहे. TO BE CONTINUE….